बातम्या
कोल्हापूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ ‘अवकारिका’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन
By nisha patil - 9/8/2025 12:45:57 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ ‘अवकारिका’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन
शारंगधर देशमुख फाउंडेशन व आजरेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी ‘अवकारिका’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आज शुक्रवारी शाहू चित्रमंदिर येथे झाले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात महापालिकेच्या 492 सफाई कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहिला.
सफाई कामगारांच्या संघर्षमय जीवनावर आणि समाजातील विषमता यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात कोल्हापूरचा कलाकार विराट मडके प्रमुख भूमिकेत आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान समाजासाठी अमूल्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, दिग्दर्शक अरविंद भोसले, म्युझिक डायरेक्टर श्रेयस देशपांडे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिगंबर फराकटे, तात्या खेडकर, रशीद बारगीर, अभिजीत चव्हाण, संभाजी जाधव, संजय सावंत, अरुण बारामते, नगरसेविका रीना कांबळे, अशपाक आजरेकर, उपायुक्त कपिल जगताप, परितोश कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आदींसह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ ‘अवकारिका’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन
|