बातम्या
रिक्षा सेनेची मोफत सेवा,आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ
By nisha patil - 8/27/2025 1:42:32 PM
Share This News:
भक्ती, सेवा आणि उत्साहाचा संगम,गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र रिक्षा सेनेची मोफत सेवा,आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ
आज सर्वत्र श्री गणेशाचे आगमन भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आलं यानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने घरगुती गणेश नेणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात आली महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे आणि युवा उद्योजक एजाज नाकाडे यांच्या संयोजनातून हा उपक्रम राबवण्यात आला. या सेवेचा प्रारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवालय शिवसेना कार्यालयापासून करण्यात आला. यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. दरम्यान या उपक्रमाचा उद्घाटन झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील रिक्षा चालवत या उपक्रमाचे कौतुक केले. कोल्हापूर शहरातील गंगावेश कुंभार गल्ली पापाची तिकटी बापट कॅम्प शाहूपुरी कुंभार गल्ली या कुंभारवाड्यांमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी या या रिक्षांच्या माध्यमातून मोफत सेवा देण्यात आली आहे. सुमारे 15 ते 16 रिक्षांचा सहभाग या उपक्रमात करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर,युवा नेते पुष्कराज क्षीरसागर,अलाउद्दीन नाकाडे, एजाज नाकाडे , अजित राडे,बबलू शिंदे,अजय पोळ ,अक्रम शेख ,सुनील जाधव ,अमजद नाकाडे ,फिरोज पठाण यांच्यासह रिक्षा चालक-मालक पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
रिक्षा सेनेची मोफत सेवा,आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुभारंभ
|