बातम्या

के.एम.सी.च्या विद्यार्थिनींचा प्रवास मोफत! के.एम.टी. पासचे वाटप!

Free travel for K M C female students


By nisha patil - 10/31/2026 2:26:39 PM
Share This News:



के.एम.सी.च्या विद्यार्थिनींचा प्रवास मोफत! के.एम.टी. पासचे वाटप!

 

शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रवास खर्चातून मोठा दिलासा! कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने यशवंतराव चव्हाण अर्थात के.एम.सी. कॉलेजमधील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास वितरित केला आहे. त्यामुळे आता विद्यार्थिनींचा कॉलेजपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या पास वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. के.एम.सी. कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना यावेळी मोफत के.एम.टी. पास देण्यात आले. शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींचा आर्थिक भार कमी व्हावा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर इस्माईल बागवान, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पासचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना विशाल शिराळे यांनी, या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा वापरही वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. नागवकर आणि पर्यवेक्षक कॅप्टन डॉ. अमित रेडेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


के.एम.सी.च्या विद्यार्थिनींचा प्रवास मोफत! के.एम.टी. पासचे वाटप!
Total Views: 15