बातम्या

महासत्ता चौक गोळीबारातील फरार संशयित जेरबंद; LCB चा सापळा!

Fugitive suspect in Mahasatta Chowk shooting arrested


By nisha patil - 11/27/2026 8:42:26 PM
Share This News:



महासत्ता चौक गोळीबारातील फरार संशयित जेरबंद; LCB चा सापळा!

 

इचलकरंजीतील महासत्ता चौक गोळीबार प्रकरणातील फरार संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून संशयिताला अटक केली आहे. सचिन उर्फ सॅम बाळासो घोरपडे वय २७, रा. कबनूर, ता. हातकणंगले असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

४ मार्च २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास महासत्ता चौकात जुन्या भांडणाच्या रागातून ओमकार कांबळे याच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ओमकार गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. त्यापैकी सॅम घोरपडे हा फरार होता. संशयित सॅम घोरपडे हा उजळाईवाडी येथील पसरिचा नगर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या सॅम घोरपडेवर यापूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, पुढील तपासासाठी आरोपीला इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


महासत्ता चौक गोळीबारातील फरार संशयित जेरबंद; LCB चा सापळा!
Total Views: 8