बातम्या
खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १.३७ कोटींचा निधी मंजूर
By nisha patil - 8/8/2025 5:15:29 PM
Share This News:
खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १.३७ कोटींचा निधी मंजूर
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश; केंद्राकडून निधी तातडीने वर्ग
कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेतली. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी खेलो इंडिया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतील शेवटचा टप्पा — १ कोटी ३७ लाख रुपये — मिळावा यासाठी त्यांनी पत्र देवून मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी तातडीने कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला.
हॉकी स्टेडियममध्ये अॅस्ट्रो टर्फ आणि अन्य सुविधा उभारण्यासाठी या निधीचा उपयोग होणार असून, कोल्हापुरातील हॉकी खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. याबद्दल खासदार महाडिक यांनी मंत्री रक्षा खडसे यांचे आभार मानले आहेत.
खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १.३७ कोटींचा निधी मंजूर
|