बातम्या

चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

Fund of Rs 5 crore approved for renovation of Chandrakant Mandre Art Museum


By nisha patil - 4/26/2025 2:54:50 PM
Share This News:



चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

आ. अमल महाडिक यांची मांडरे संग्रहालयाला भेट

 मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते आणि मनस्वी चित्रकार स्व.चंद्रकांत मांडरे यांनी स्वतःचा राहता बंगला 1987 साली महाराष्ट्र शासनाला कलासंग्रहालय निर्मितीसाठी दान केलाय. या ठिकाणी मांडरे यांनी रेखाटलेल्या विविध जलरंग आणि तैलरंगातील चित्रांचे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात आलंय. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या संग्रहालयाला आ.अमल महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मांडरे कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेत नूतनीकरण करण्याऐवजी संपूर्ण इमारत नव्याने उभारण्याची गरज समोर आली. या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा विश्वास आ. अमल महाडिकांनी दिला. यावेळी पृथ्वीराज मांडरे, उदय सुर्वे, सहाय्यक अधीक्षक यदुराज पाटील उपस्थित होते.


चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
Total Views: 153