बातम्या
बुरुड कॉर्नर ते सीडी फार्म पर्यंतच्या रस्त्याला निधी द्या
By nisha patil - 11/14/2026 3:16:51 PM
Share This News:
बुरुड कॉर्नर ते सीडी फार्म पर्यंतच्या रस्त्याला निधी द्या
*नगरसेविका रेश्मा बुडडेखान यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
*आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायत हद्दीतील मेघना कोल्ड्रिंक्स समोरील तिट्टा ते सीडी फार्मपर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून निधी मिळणेसाठी नगरसेविका सौ. रेश्मा नौशाद बुड्डेखान यांनी निवेदनातून मागणी केली आहे. हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुड्डेखान यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा नगरपंचायत हद्दीतील मेघना कोल्ड्रिंक्स समोरील तिट्टा ते सीडीफार्म पर्यंतचा रस्ता हा माझ्या प्रभागातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता महागाव, नेसरी, बेळगाव, चंदगड कोवाड, वाटंगी अशा महत्वाच्या गावाना जोडणारा रस्ता आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी, कामगार, तसेच रुग्ण, वृद्ध व नागरिक ये-जा करत असतात.सदर रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून टू व्हीलर तसेच इतर वाहने चालवताना त्रास होत आहे. त्यामुळे शेतमाल व इतर मालाची वाहतूक करून नेण्यास,ऊसाची वाहतूक करणेस,रुग्णांना दवाखान्यात नेताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.घडलेल्या अपघातात गंभीर दुखापतीही झाल्या आहेत.
प्रभागातील नागरिकांनी वारंवार या रस्त्याबाबत तक्रार केली आहे. तरी सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आपणांस नम्र विनंती आहे की, सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी आपल्या निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
बुरुड कॉर्नर ते सीडी फार्म पर्यंतच्या रस्त्याला निधी द्या
|