विशेष बातम्या
कोल्हापुरातील कृषी भवनासाठी ₹३५ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर!
By nisha patil - 9/10/2025 5:35:38 PM
Share This News:
कोल्हापुरातील कृषी भवनासाठी ₹३५ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर!
आमदार अमल महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं आहे. राज्य सरकारने शेंडा पार्क, कोल्हापूर येथे कृषी भवन उभारण्यासाठी ₹३५.३१ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या इमारतीमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि कार्यशाळा सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आमदार महाडिक यांनी हे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, असं सांगत सर्व मान्यवरांचे आभार मानले
कोल्हापुरातील कृषी भवनासाठी ₹३५ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर!
|