बातम्या
कणेरीवाडी रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर
By nisha patil - 4/22/2025 8:39:35 PM
Share This News:
कणेरीवाडी रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर
आ. अमल महाडिक यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
गावांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – आ. महाडिक यांची ग्वाही
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कणेरीवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कणेरीवाडी कमान ते अक्षदा हॉल या मुख्य रस्त्यासाठी एक कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असुन या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ.अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांशी बोलताना आ.अमल महाडिक म्हणाले की, मतदारसंघातील गावांमध्ये दर्जेदार रस्ते, मुबलक पिण्याचे पाणी,गटारी आणि स्ट्रीट लाईटसाठी प्राधान्यक्रम दिल्याचे सांगितले. याप्रसंगी सरपंच सुरेशराव मोरे दादा,पांडुरंग खोत,आबा शेळके,रविंद्र मोरे,बंडोपंत मोरे,मधुकर खोत,कुमार मोरे,बाजीराव खोत,सुभाष भोसले, मारुती खोत,शिवाजी खोत,संदीप खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कणेरीवाडी रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर
|