बातम्या

शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर; आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

Funds of Rs 3 6 crore approved for Shingnapur and Nagdevwadi pumping stations


By nisha patil - 11/10/2025 5:32:25 PM
Share This News:



शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर; आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी पावले उचलण्यात आली आहेत. शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमध्ये नवीन उपसा पंप बसवण्यासाठी तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आमदार अमल महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून थेट पाईपलाईन योजनेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने कोल्हापूरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सव काळात सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिक संतप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार महाडिक यांनी शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती.

या दोन्ही केंद्रांवर नवीन पंप बसवल्यास थेट पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यासुद्धा शहराला पुरेसा पाणीपुरवठा शक्य होईल, हे त्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनास आणून दिले.

महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मंजुरी देत निधी मंजूर केला आहे.

लवकरच हा निधी महापालिकेकडे वर्ग केला जाईल आणि निविदा प्रक्रिया सुरू होईल. या दोन्ही पंपिंग स्टेशनमुळे कोल्हापूरला आता पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही.


 आमदार अमल महाडिक म्हणाले :

“शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे मनःपूर्वक आभार. या दोन्ही पंपिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, याची खात्री आहे.”


शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर; आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
Total Views: 73