विशेष बातम्या

गडहिंग्लज : सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन

Gadhinglaj Bell ringing protest demanding


By nisha patil - 10/12/2025 3:29:25 PM
Share This News:



गडहिंग्लज : सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली. दोन महिने सातत्याने मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने संघटना आक्रमक झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी सोयाबीनची पोती घेऊन प्रांत कार्यालयात दाखल झाले असून, राज्य सरकारकडे सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव पाठवूनही मान्यता न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारकडे बारदान खरेदीसाठी आणि हमीभावाने शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी निधी नसल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यात जाणूनबुजून टाळाटाळ होत असल्याचा आरोप गड्यान्नावर यांनी केला.

शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देऊन खरेदी केंद्र सुरू करावे, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे.


गडहिंग्लज : सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन
Total Views: 19