राजकीय
गडहिंग्लजला राष्ट्रीय पातळीवरील 'स्मार्ट सिटी' बनवणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही राष्ट्रवादीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी
By nisha patil - 1/12/2025 11:17:36 AM
Share This News:
गडहिंग्लज:- गडहिंग्लजची अनेक वर्षे सत्ता ज्या मंडळीकडे दिली त्या मंडळींनी शहराचे वाटोळे केले, असा आरोप करत 'रात्र वैऱ्याची आहे, भावनिक होवू नका आणि सोज्वळ चेहऱ्याकडे बघून फसू नका' अशी जोरदार टिका विरोधकांचे नाव टाळत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सत्ता द्या राष्ट्राच्या नकाशावर 'स्मार्ट सिटी' म्हणून गडहिंग्लजला झळकवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पॅनेलची जाहीर प्रचार सभा म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर रविवारी रात्री पार पडली. या प्रचार सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. विरोधकांवर हल्ला बोल करत मंत्री मुश्रीफ यांनी भावनेचा खेळ करत शहराची सत्ता मिळवली. शहरात एकही वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यात विरोधकांना यश आले नाही. थैलिशाही आणि टक्केवारीचा खेळ करणाऱ्या या मंडळींना गडहिंग्लजकरांनी रोखून विकासाला साथ द्यावी असे आवाहन केले.
गडहिंग्लज पालिकेवर प्रशासक आल्यानंतरच १५० कोटीचा निधी देता आला असे सांगत शहरातील विविध विकासकामे करता आली. गडहिंग्लजला सुसज्ज स्टेडियमसाठी ५० कोटी रुपये खर्चनार असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी सोज्वळ, धार्मीक, निर्व्यसनी अशा महेश तुरबतमठ यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीला शहराची एकहाती सत्ता दिल्यास भुयारी गटर, एसटीटी प्लॅट, बेघरांसाठी ३ हजार घरकुले बांधुन देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करत एकवेळ संधी द्या. शहरात २० वर्षे जी कामे झाली नाहीत ती करत गडहिंग्लजचा स्वर्ग करत देशाच्या नकाशावर गडहिंग्लजचे नाव आणल्याशिवाय रहाणार नाही असे आश्वासन शेवटी दिले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, रफीक पटेल, संतोष चिकोडे, नागेश चौगुले, शबनम सय्यद, रामदास कुराडे यांनी मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर राजशेखर दड्डी, जे. बी. बारदेस्कर, उदयराव जोशी, गोडसाखरचे चेअरमन प्रकाश पताडे, सतिश पाटील, सिध्दार्थ बन्ने, शशिकांत खोत यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.
गडहिंग्लजला राष्ट्रीय पातळीवरील 'स्मार्ट सिटी' बनवणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही राष्ट्रवादीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी
|