बातम्या

गडहिंग्लजला लवकरच प्रशासकीय भवन!

Gadinglaj


By nisha patil - 2/7/2025 11:36:25 PM
Share This News:



गडहिंग्लजला लवकरच प्रशासकीय भवन!


गडहिंग्लज शहरात बहुप्रतीक्षित प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाची ७५ गुंठे जागा महसूल विभागाला देण्याचा निर्णय झाला.

या जागेवर गडहिंग्लज-चंदगड प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध सरकारी कार्यालयांसाठी हक्काची इमारत उभारली जाणार आहे. नागपूर अधिवेशनात यासाठीच्या निधीची तरतूद होणार आहे.

हा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारामुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले.


गडहिंग्लजला लवकरच प्रशासकीय भवन!
Total Views: 125