बातम्या
गडहिंग्लज, हलकर्णी, इब्राहिमपूर, गवसे रस्ता कामाच्या संदर्भात बैठकीची मागणी
By nisha patil - 4/30/2026 2:58:03 PM
Share This News:
**गडहिंग्लज, हलकर्णी, इब्राहिमपूर, गवसे रस्ता कामाच्या संदर्भात बैठकीची मागणी **
**आजरा(हसन तकीलदार)*:-उपविभागीय अधिकारी आजरा-भुदरगड यांच्या अध्यक्षतेखाली आजरा तहसीलदार दालनात गडहिंग्लज, हलकर्णी, इब्राहिमपूर, गवसे मार्गाच्या कामाबाबत चर्चा करणेकारिता बैठकीची मागणी शिवसेना उबाठा आजरा तर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेली वर्षभर गडहिंग्लज, हलकर्णी, इब्राहिमपूर, गवसे मार्गाचे काम सुरु आहे. या मार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ आहे. त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी अपघाती वळणे काढणे गरजेची होती ती वळणे काढलेली नाहीत.ज्या ठिकाणी रस्ता करायचा आहे त्या जुन्या रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यामुळे अनेक अपघात होत आहेत.यात काहीजणांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत.सध्या यात्रा, लग्न समारंभाचे कार्यक्रम सुरु असलेने याठिकाणी वाहतूकिची वर्दळ वाढलेली आहे. त्यातच आता पावसाळ्याचे दिवसही जवळ येत आहेत. वाळवाचे पाऊस पडत आहेत.त्याआधी या रस्त्याची डागडूगी होणे गरजेचे आहे काही ठिकाणी मोऱ्या बांधणेसाठी उकरून खड्डे मारून ठेवलेले आहेत.ते काम अजूनही पूर्ण झालेले नाही. रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले आहे. पर्यायी सुविधा काहीही केलेल्या दिसून येत नाहीत.त्या अनुषंगाने अशा अनेक विषयावर चर्चा करणेसाठी उपविभागीय अधिकारी आजरा-भुदरगड यांच्या अध्यक्षतेखाली आजरा तहसीलदार दालनात तत्काळ बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव, हरिश्चंद्र व्हराकटे, अरुण कांबळे, रोहन गिरी, महादेव गुरव आदिजणांच्या सह्या आहेत.
गडहिंग्लज, हलकर्णी, इब्राहिमपूर, गवसे रस्ता कामाच्या संदर्भात बैठकीची मागणी
|