बातम्या
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली नाम. गडकरी यांची भेट
By nisha patil - 6/15/2026 4:49:37 PM
Share This News:
*जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली नाम. गडकरी यांची भेट*
**आजरा(हसन तकीलदार)*:-कोल्हापूर जिल्ह्याच्या वाहतूक सुविधांच्या उन्नतीसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच भेट घेतली.मतदार संघातील प्रमुख प्रश्नावर चर्चा करण्यात. आणि यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
यामध्ये प्रामुख्याने राज्य महामार्गावरील मुदाळतिट्टा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी केंद्रीय राखीव निधी (CRF) अंतर्गत मंजुरी, संकेश्वर-आजरा-बांदा राष्ट्रीय महामार्गावरील एम.आय. डी. सी. आजरा येथील विद्यमान टोल नाका स्थलांतरित करणे व गारगोटी-कोल्हापूर रस्ता दुरूस्तीसाठी निधिची मागणी नामदार गडकरीयांच्याकडे केली. यावर त्यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील रस्ते विकास व वाहतूक सुविधा उन्नतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सदगुरु संत बाळूमामा यांच्या पवित्र स्थळी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून येतात. त्यामुळे कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील मुदाळतिट्टा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर राज्य महामार्ग क्रमांक १८९ वर मुदाळतिट्टा येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली. या उड्डाणपूलामुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक यांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती दिली.
संकेश्वर-आजरा-बांदा राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान टोल नाका आजरा शहराजवळ असल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. शहराचा विस्तार आणि वाढती वस्ती लक्षात घेता, हा टोल नाका घाटकरवाडी-आंबोली मार्गादरम्यान स्थलांतरित करण्याची अनेक नागरिकांची मागणी असुन, टोल नाका स्थलांतरित केल्यास स्थानिक प्रवाशांची गैरसोय कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, असेही या भेटी दरम्यान नाम.गडकरी यांच्या नाम. आबिटकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर गारगोटी- कोल्हापूर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या तीनही विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नक्कीच नवी गती प्राप्त होईल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली नाम. गडकरी यांची भेट
|