बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गडमुडशिंगीमध्ये महाराष्ट्रातील पहिलं ७५ वडांचं “नमो पार्क”
By nisha patil - 9/18/2025 6:05:13 PM
Share This News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गडमुडशिंगीमध्ये महाराष्ट्रातील पहिलं ७५ वडांचं “नमो पार्क”
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे महाराष्ट्रातील पहिलं ७५ वडांच्या झाडांचं “नमो पार्क” उभारण्यात आलं. वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीने “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
➡️ सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पार्कचं उद्घाटन झालं.
➡️ वनविभागाच्या जागेत वन्य प्राण्यांसाठी हॉस्पिटल उभारण्याची मागणी योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शासन स्तरावर किंवा मोठ्या उद्योगांच्या CSR फंडातून हे हॉस्पिटल उभारण्याची ग्वाहीही दिली.
➡️ खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की, १७ सप्टेंबरपासून सुरु झालेले लोकाभिमुख कार्यक्रम २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. संसद खेल महोत्सवात १० हजारांहून अधिक खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे.
या कार्यक्रमात:
-
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वटवृक्ष लागवड.
-
पंडीत माळी यांचा ७५ किमी सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश दिल्याबद्दल सन्मान.
-
बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप.
-
शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेझीम आणि हलगी पथकाने स्वागत.
कार्यक्रमाला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, भाजप पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रीन मुडशिंगीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गडमुडशिंगीमध्ये महाराष्ट्रातील पहिलं ७५ वडांचं “नमो पार्क”
|