बातम्या
गजानन गुरव यांनी स्वीकारली निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे
By nisha patil - 11/13/2025 5:26:07 PM
Share This News:
गजानन गुरव यांनी स्वीकारली निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे
जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे आज गजानन गुरव यांनी स्वीकारली. मंगळवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
माजी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना यावेळी निरोप देण्यात आला. तेली यांची वर्धा येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता होती.
गुरव हे यापूर्वी पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी २००९ ते २०१० दरम्यान शाहूवाडी तहसीलदार आणि २०१७ ते २०१९ दरम्यान शिरोळ तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. तसेच सोलापूर आणि पंढरपूर या जिल्ह्यांमध्येही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
आता त्यांच्या कार्यकाळात अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखडा, तसेच जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाचे आव्हान त्यांच्या समोर असेल.
गजानन गुरव यांनी स्वीकारली निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे
|