बातम्या

आप च्या जिल्हाध्यक्ष पदी गळतगे, पताडे 

Galtage Patade to be appointed as AAP district president


By nisha patil - 11/14/2026 10:19:48 PM
Share This News:



आप च्या जिल्हाध्यक्ष पदी गळतगे, पताडे 

आम आदमी पार्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील अध्यक्ष निवडी नुकताच जाहीर केल्या. पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा (उत्तर विभाग) करवीर, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या कार्यक्षेत्रासाठी अरुण गळतगे यांची, तर कोल्हापूर जिल्हा (दक्षिण विभाग) गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड या कार्यक्षेत्रासाठी ओंकार पताडे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

विधानसभा पातळीवरील संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना पक्षाकडून प्राप्त झाल्या असून, हे काम सक्षमपणे पार पडावे यासाठी या निवडी करण्यात आल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.


आप च्या जिल्हाध्यक्ष पदी गळतगे, पताडे 
Total Views: 14