बातम्या
पत्र्याच्या शेडमध्ये रंगला जुगाराचा डाव; पोलिसांची धडक कारवाई, १३ जणांना बेड्या!
By nisha patil - 12/11/2026 10:43:45 PM
Share This News:
पत्र्याच्या शेडमध्ये रंगला जुगाराचा डाव; पोलिसांची धडक कारवाई, १३ जणांना बेड्या!
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाचगाव येथील शांतीनगर गाडगीळ कॉलनी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल १३ जणांना रंगेहात पकडलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रदीप भगवान गाडगीळ यांच्या फ्लॅटमधील पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जागामालक प्रदीप गाडगीळ यांच्यासह एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी घटनास्थळावरून सहा मोटारसायकली, १३ मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सर्व १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे पाचगाव परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांचे धाबे दणाणले आहेत.
पत्र्याच्या शेडमध्ये रंगला जुगाराचा डाव; पोलिसांची धडक कारवाई, १३ जणांना बेड्या!
|