बातम्या
गंधर्व गोगावले शहर प्रमुख, तर विश्वजीत तळसंदेकर उपाध्यक्षपदी नियुक्त
By nisha patil - 6/20/2025 6:49:09 PM
Share This News:
गंधर्व गोगावले शहर प्रमुख, तर विश्वजीत तळसंदेकर उपाध्यक्षपदी नियुक्त
मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नवी नियुक्ती, पेठवडगावात नियुक्तीपत्र वितरण
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. पैलवान प्रविण माने यांच्या वतीने, गंधर्व गोगावले यांची शहर प्रमुख तर विश्वजीत तळसंदेकर यांची शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या दोघा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. राजू जाधव यांच्या हस्ते पेठवडगाव येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी परिसरातील युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. निवडीच्या वेळी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.
गंधर्व गोगावले शहर प्रमुख, तर विश्वजीत तळसंदेकर उपाध्यक्षपदी नियुक्त
|