बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
By nisha patil - 3/10/2025 4:54:04 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुलात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
आजरा (हसन तकीलदार): व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक पांडुरंग जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाले.
संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सत्य, अहिंसा, साधेपणा आणि कृषीप्रधान विचार यांचे महत्त्व पटवून देताना सांगितले की –"गांधीजींच्या विचारांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे. खोट्या इतिहासाच्या आधारे समाजाची निर्मिती होऊ शकत नाही."
त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, चीनसारख्या देशांकडून शिकण्याची गरज, तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताचा विचार करून प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी एन. सी. हरेर यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमास संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, सुधीर जाधव, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, प्रभारी प्राचार्य पन्हाळकर सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन एल. पी. कुंभार यांनी केले. प्रास्ताविक पी. व्ही. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एन. एन. पाष्ठे यांनी मानले.
व्यंकटराव शिक्षण संकुलात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
|