बातम्या
गांधी जयंतीपासून जिल्ह्यात जलसाक्षरता जागृती मोहिमेस प्रारंभ – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 9/29/2025 8:31:36 PM
Share This News:
गांधी जयंतीपासून जिल्ह्यात जलसाक्षरता जागृती मोहिमेस प्रारंभ – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. 29 –जिल्ह्यातून वाहणाऱ्या कडवी, कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या किनारी असणाऱ्या गावांमध्ये येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून जलसाक्षरता मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
राजर्षी शाहू सभागृहात जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती तसेच “चला जाणूया नदीला” या मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तालुकास्तरीय समिती नेमण्यात याव्यात. नदीकिनाऱ्यावरील प्रत्येक गावातून एक जल सेवक निवडावा. तसेच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा.
बैठकीत जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी जलसाक्षरता अभियान व चला जाणूया नदीला या मोहिमेबाबत सविस्तर विवेचन केले.
या प्रसंगी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, ए.एस. मेश्राम, एस.एन. निबांळकर, बी.जी. साठे, सुशाम शिंदे, गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
गांधी जयंतीपासून जिल्ह्यात जलसाक्षरता जागृती मोहिमेस प्रारंभ – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|