बातम्या
गांधीनगर जवळील कचरा डेपो मधील आग लावलेला कचऱ्याची विल्हेवाट
By nisha patil - 1/19/2026 5:19:22 PM
Share This News:
गांधीनगर जवळील कचरा डेपो मधील आग लावलेला कचऱ्याची विल्हेवाट
आजरा(हसन तकीलदार ):- गांधीनगर येथील कचरा डेपोच्या साईडला टाकलेल्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेजारीच असलेल्या खेळाच्या मैदानात खेळण्यासाठी, सकाळी धावण्यासाठी, व्यायामासाठी, तसेच सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.
यामुळे तेथील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येत असलेबद्दल सांगण्यात येत आहे.शेजारीअसणाऱ्या आवंडी वासाहतीच्या आणि गांधीनगरच्या रहिवाशीयांना याचा त्रास होत असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत.
अन्याय निवारण समितीने याबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला.मैदानावरती येणाऱ्या जळालेल्या कचऱ्याचा धूर हा विषय गेले तीन चार दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.
त्यामुळे आज सकाळी11:00वाजता अन्याय निवारण समितीच्या नगरसेविका डॉ. सौ.स्मिता कुंभार,नगरसेवक तसेच अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बामणे भाऊजी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून आग लागलेला सर्व कचरा तिथून हटवण्याची मागणी केली त्यामुळे आज गांधीनगरच्या नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर यांचे पती महेश खेडेकर हे अग्निशामक गाडी व जेसीबी घेऊन जाऊन वरील सर्व कचरा वीझवून त्या ठिकाणाहून हटवण्याचे काम जोरात चालू केले आहे.
हे काम एका दिवसात संपणार नाही त्याला पुढील तीन-चार दिवस लागतील पण सर्व कचरा हटवण्यासाठी नगर पंचायतीचे आरोग्य खात्याचे अधिकारी अमर कांबळे यांना सांगितले असल्याचे बामणे भाऊजी यांनी सांगितले.
गांधीनगर जवळील कचरा डेपो मधील आग लावलेला कचऱ्याची विल्हेवाट
|