बातम्या
कोल्हापूरच्या समस्या अधोरेखित करण्यासाठी गणेश लाड यांची अंगावर पोस्टर परिधान जनजागृती
By nisha patil - 2/9/2025 11:47:57 PM
Share This News:
कोल्हापूरच्या समस्या अधोरेखित करण्यासाठी गणेश लाड यांची अंगावर पोस्टर परिधान जनजागृती
कोल्हापूर / प्रतिनिधी : शहरातील वाढत्या समस्या आणि महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात आज एक आगळावेगळा जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड (उज्वल कोल्हापूर संघटना) यांनी अंगावर पोस्टर परिधान करून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे शासन व महापालिकेचे लक्ष वेधले.
या पोस्टरवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत गंभीर प्रश्न मांडण्यात आले होते –
💧 पाणी ठप्प – जनता हैराण
🛣️ रस्ते खड्डेमय – स्मार्ट सिटी गायब
🗑️ कचरा ढीग – स्वच्छता शून्य
🚦 ट्रॅफिक कोंडी – पार्किंग गायब
💰 भ्रष्टाचार भारी – विकास नाही
📊 जनता कर भरते – हिशोब कुठे ?
तसेच “आधी सेवा घ्या – मग हद्द वाढवा” आणि “चला एकत्र येऊया, उज्ज्वल कोल्हापूर घडवूया” अशा घोषणांद्वारे नागरिकांना जागरूक होण्याचे आवाहन करण्यात आले.
या अनोख्या उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, शहरातील मूलभूत समस्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
हा उपक्रम गणेश लाड, उज्वल कोल्हापूर संघटना यांच्या वतीने राबविण्यात आला.
कोल्हापूरच्या समस्या अधोरेखित करण्यासाठी गणेश लाड यांची अंगावर पोस्टर परिधान जनजागृती
|