शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयातर्फे गणेशमूर्ती दान उपक्रम
By nisha patil - 2/9/2025 11:39:40 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयातर्फे गणेशमूर्ती दान उपक्रम
कोल्हापूर / प्रतिनिधी : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभाग आणि एनएसएस विभागाच्यावतीने पंचगंगा घाटावर गणेशमूर्ती दान उपक्रम राबविण्यात आला.
घरगुती गणपती विसर्जनानिमित्त विद्यार्थ्यांनी मूर्ती कुंडामध्ये विसर्जित करून घेतल्या. तसेच निर्माल्य वेगळे गोळा करून ‘अवनी’ संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमात पर्यावरणशास्त्र व एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले.
यावेळी कॉमर्स विभागाचे प्रा. मोरे, प्रा. कोल्हापूरे, श्री. विजय लाड आणि श्री. अतुल कांबळे उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी उपक्रमाला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
या उपक्रमाचे संयोजन डॉ. प्रशांत पाटील व प्रा. दीपा पाटील यांनी केले.
शहाजी महाविद्यालयातर्फे गणेशमूर्ती दान उपक्रम
|