बातम्या
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना
By nisha patil - 8/28/2025 11:16:52 AM
Share This News:
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना
एकता, स्नेह व उत्साहाचे प्रतीक ठरला गोकुळचा गणेशोत्सव
कोल्हापूर- : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना पार पडली. प्रतिष्ठापनेनंतर पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व आरती करून श्री गणरायाचे आशीर्वाद घेण्यात आले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी व हितचिंतक यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की गोकुळ परिवारातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. उत्सवामुळे संघातील सदस्यांमध्ये एकता, स्नेह आणि उत्साह वृद्धिंगत होतो, असेही त्यांनी नमूद केले.
गोकुळ संघात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत असून, ही परंपरा सदस्यांसाठी श्रद्धा व प्रेरणादायी ठरते आहे.
या कार्यक्रमाला संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, विनोद वानखेडे, सुभाष नाळे, बाळासो वायदंडे, कृष्णात पाटील, प्रथमेश पाटील, नितीन तोडकर, राहुल थोरवडे तसेच गणेशोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना
|