बातम्या
पन्हाळा विद्यामंदिर येथे गणेशोत्सव व वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/9/2025 12:29:10 PM
Share This News:
पन्हाळा विद्यामंदिर येथे गणेशोत्सव व वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न.
गेली 87 वर्ष अखंडित परंपरा असलेला, पन्हाळा विद्यामंदिर पन्हाळा या प्रशालेचा श्री गणेशोत्सव व वर्धापनदिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.
28 ऑगस्ट 1938 रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रशालेची स्थापना झाली. तेव्हापासून प्रशालेमध्ये गणेशोत्सव व वर्धापन दिन साजरा करण्याची परंपरा आहे, यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा अखंडित राहिली.
श्री गणेश आगमनाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने थाटामाटात श्री गणेशाची प्रतिष्ठापना प्रशालेमध्ये करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थी पालक व शिक्षकांनी अतिशय मनोभावी श्री गणेशाची पूजा अर्चना केली.
गुरुवार दिनांक 04/09/2025 रोजी. श्री गणेशोत्सव व वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी रंगावली प्रदर्शन, हळदी - कुंकू, दुग्धपान, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या श्री गणरायांच्या विविध मूर्तींचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या गणरायाच्या चित्रांचे प्रदर्शन, प्रशालेच्या अनेक सहशालेय उपक्रमांचे चित्र प्रदर्शन, अटल टिंकरिंग लॅबच्या मदतीने तयार केलेल्या अनेक प्रोजेक्टचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक व शाळेवर स्नेह असणाऱ्या स्नेही जनांनी उपस्थिती दर्शवली, आणि सर्व प्रदर्शनाचे कौतुक केले. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंतीचे यंदाचे 750 वे वर्ष या अनुषंगाने प्रशालेमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत चांगदेव भेट या देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या देखाव्याने देखील उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाला पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी,परिसरातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी सदिच्छा भेट दिली. अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या श्री.गणेशाला मनोभावे निरोप दिला.
पन्हाळा विद्यामंदिर येथे गणेशोत्सव व वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न
|