बातम्या

दरोड्याआधीच टोळी जेरबंद; तलवारींसह पाच जण ताब्यात!

Gang nabbed before the robbery


By nisha patil - 6/10/2026 2:32:30 PM
Share This News:



दरोड्याआधीच टोळी जेरबंद; तलवारींसह पाच जण ताब्यात!

 दरोड्याच्या तयारीत घातक शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या पाच जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले. जुना रामकृष्ण हॉल ते लोणार वसाहत जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काळ्या-पिवळ्या रिक्षामध्ये ४ ते ५ जण घातक शस्त्रांसह बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून रोहन उर्फ टिल्या सुहास होळकर, विजय उर्फ गदर लुमवेल सकटे, पियुष शंकर पवार, जावेद अजीज मणेर आणि अनिल गंगाराम हिरवे यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयितांकडून दोन धारदार तलवारी, हॉकी स्टीक, लोखंडी कटवणी, बॅटरी, मिरची पूड, मोबाईल, सॅक आणि रिक्षा असा एकूण १ लाख २७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे करीत आहेत.


दरोड्याआधीच टोळी जेरबंद; तलवारींसह पाच जण ताब्यात!
Total Views: 14