बातम्या

महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

Gang pushing women into prostitution busted


By nisha patil - 7/10/2026 11:16:31 PM
Share This News:



महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

 

गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला. कंदलगाव-चित्रनगरी मार्गावरील ‘ए टू लॉज’वर छापा टाकून महिला दलालासह लॉज मालकाला अटक करण्यात आली. सरिता रणजीत पाटील मोरेवाडी आणि अमोल रमेश पवार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आसाम आणि पश्चिम बंगालमधील दोन पीडित महिलांची सुटका केली.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बनावट ग्राहकांच्या माध्यमातून सापळा रचला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर सरिता पाटील दोन महिलांना मोपेडवरून ए टू लॉजवर घेऊन आली. महिलांना ग्राहकांकडे सोपवताच पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

तपासात प्रत्येक ग्राहकामागे ५०० रुपये स्वतःकडे ठेवून लॉज मालकाला प्रत्येक महिलेमागे ३०० रुपये दिले जात असल्याचे समोर आले. कारवाईत ६४ हजार रुपये रोकड, दोन मोबाईल आणि मोपेड असा सुमारे ८४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे आणि त्यांच्या पथकाने केली.


महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक
Total Views: 6