बातम्या
वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी गजाआड — दोन महिलांची सुटका
By nisha patil - 10/15/2025 3:59:06 PM
Share This News:
वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी गजाआड — दोन महिलांची सुटका
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेसह तिघा पुरुषांना अटक केली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अवैध वेश्या व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याच्या सूचनेनुसार करण्यात आली.
📍 घटनास्थळ: साईश अपार्टमेंट, मणेर मळा, उचगाव (ता. करवीर)
📅 तारीख: 13 ऑक्टोबर 2025
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. त्यावेळी सुजाता सचिन साळुंखे (वय 34) हिला अटक करण्यात आली.
ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या ताब्यातून मुंबई व इचलकरंजी येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली.
🔹 अटक आरोपी:
सुमित नेमीनाथ देशमाने (रा. कबनूर, इचलकरंजी),
लखन मोहन कांबळे (रा. विक्रमनगर, कोल्हापूर),
तौसिफ ताजुद्दीन सुतार (रा. विक्रमनगर, कोल्हापूर).
🔸 जप्त मुद्देमाल:
रोख ₹10,470,
5 मोबाईल हँडसेट,
स्विफ्ट डिझायर कार (MH-09-CM-6314),
अपे रिक्षा (MH-09-EL-4240),
निरोध पाकिटे – एकूण किंमत ₹8,56,530/-.
आरोपी महिला प्रत्येक ग्राहकाकडून ₹500 घेत व्यवसाय चालवत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार व अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत रविंद्र कळमकर, शितलकुमार कोल्हाळ, राजेंद्र घारगे, हिंदुराव चरापले, सायली कुलकर्णी, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, अमित मर्दाने आणि प्रज्ञा पाटील यांनी सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्हा पोलिसांची ही कारवाई महिला अत्याचार व मानवी तस्करी रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.
वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी गजाआड — दोन महिलांची सुटका
|