बातम्या
गारगोटीचे प्रांत कार्यालय विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
By nisha patil - 8/14/2025 11:44:40 PM
Share This News:
गारगोटीचे प्रांत कार्यालय विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
गारगोटी येथील प्रांत कार्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गारगोटी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड - आजरा तालुक्यासाठी असलेले गारगोटी येथील प्रांत कार्यालय रात्री विद्युत रोषणाईने उजळून निघाले. त्यामुळे गारगोटी शहराच्या सौंद्रर्यात वाढच झाली.
भुदरगड आणि आजरा या दोन तालुक्यासाठी गारगोटी येथे नव्याने उपविभागीय तथा प्रांत कार्यालयाची इमारत मध्यवर्ती ठिकाणी आहे. शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन असल्याने या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, यामुळे आज ही इमारत उजळून निघाली.
गारगोटीचे प्रांत कार्यालय विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
|