बातम्या
डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार
By nisha patil - 8/19/2025 6:21:04 PM
Share This News:
🌍 डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार
— विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, उच्च शिक्षण व नेटवर्किंगची नवी संधी
कोल्हापूरात डी. वाय. पाटील ग्रुप आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हॉटेल सयाजी येथे झालेल्या ‘कोल्हापूर टू ग्लोबल’ या विशेष सेमिनारमध्ये या करारावर शिक्कामोर्तब झाले.
या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, मेंटर्सचे नेटवर्किंग, गुंतवणूकदारांशी संवाद यासह विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कार्यशाळा, सेमिनार, स्पर्धा तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय डी. पाटील होते. ‘गर्जे मराठी’चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, सहसंस्थापक माधव दाबके, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
👉 आनंद गानू यांनी विद्यार्थ्यांना “आपले प्लस पॉइंट सांगा, व्यक्त व्हा, कल्पना शेअर करा, मागायला लाजू नका” असा यशाचा कानमंत्र दिला.
👉 ऋतुराज पाटील यांनी “गर्जे मराठी जगभरात २६ देशांत १५,५०० हून अधिक मराठी लोकांना जोडत आहे, नेटवर्किंग हेच उद्याचे भविष्य आहे” असे सांगितले.
👉 माधव दाबके यांनी “समस्या ओळखा, उपाय शोधा आणि इनोव्हेशन घडवा” असे प्रतिपादन केले.
दुपारच्या सत्रात प्राध्यापकांना इंडस्ट्रीतील संधी, सॉफ्ट स्किल्स, फॉरेन लँग्वेज आणि संशोधनावर भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील ग्रुपच्या सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, ‘गर्जे मराठी’चे संग्रामसिंह जाधव, विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार नुपूर देशमुख यांनी मानले.
डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार
|