बातम्या
गरुड मंडपामुळे अंबाबाई किरणोत्सव परंपरेला बाधा नको; महिला आघाडीची मागणी
By nisha patil - 7/19/2025 10:32:03 AM
Share This News:
गरुड मंडपामुळे अंबाबाई किरणोत्सव परंपरेला बाधा नको; महिला आघाडीची मागणी
कोल्हापूर : आई अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव परंपरेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर अमोल येडगे आणि देवस्थान समिती अध्यक्ष शिवराज नाईकवडे यांना निवेदन देण्यात आले.
मंदिरात सध्या गरुड मंडपाचे बांधकाम सुरू असून, देवीच्या चरणापासून मुखापर्यंत येणाऱ्या किरणोत्सव मार्गात हा मंडप अडथळा ठरू नये यासाठी बांधकाम करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ड्रॉइंग करून योग्य नियोजन करावे, अशी महिला आघाडीची मागणी आहे.
किरणोत्सव ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा असून, मंदिर हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वर्षा पाटील, पल्लवी चिखलीकर, जयश्री माडीमगिरी, रूपाली घोरपडे, आसावरी सुतार, कोमल पवार आणि स्वाती सांगावकर उपस्थित होत्या.
गरुड मंडपामुळे अंबाबाई किरणोत्सव परंपरेला बाधा नको; महिला आघाडीची मागणी
|