बातम्या

 गॅस सिलिंडर महाग; युद्धाचा परिणाम कोल्हापूरच्या स्वयंपाकघरात”

Gas cylinders are expensive


By Administrator - 10/3/2026 1:31:47 PM
Share This News:



 गॅस सिलिंडर महाग; युद्धाचा परिणाम कोल्हापूरच्या स्वयंपाकघरात”

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट कोल्हापूरकरांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाल्याने गॅस सिलेंडर टाकी 9 30 रुपये झाली आहे त्यामुळे नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे.
 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा निर्माण होईल या भीतीमुळे अनेक नागरिकांनी सिलिंडर साठवण्याची धावपळ सुरू केली आहे. परिणामी शहरातील काही गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
 

या परिस्थितीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींच्या साठ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त साठवणूक आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
 

दरम्यान, गॅस कंपन्यांनीही नवे नियम लागू केले आहेत. आता एकदा सिलिंडर घेतल्यानंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान २१ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.सध्या जिल्ह्यात अंदाजे ४५ दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याचा सांगितलं जात आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

दररोज सुमारे ९ हजार सिलिंडरचा पुरवठा केला जातो, तर जिल्ह्यात ५४ गॅस एजन्सी कार्यरत आहेत.
मात्र युद्धाची छाया बाजारावर आणि स्वयंपाकघरावर पडू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती कितपत सुरळीत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 गॅस सिलिंडर महाग; युद्धाचा परिणाम कोल्हापूरच्या स्वयंपाकघरात”
Total Views: 10