ताज्या बातम्या

कळंबा जेल परिसरात गॅस स्फोटचौघे जखमी महिलेचा मृत्यू

Gas explosion in Kalamba jail area


By nisha patil - 8/26/2025 12:46:16 PM
Share This News:



कळंबा जेल परिसरात गॅस स्फोट; चौघे जखमी, महिलेचा मृत्यू

 कोल्हापूर
कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गॅस स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन लहान मुलांसह चार जण गंभीर जखमी झाले असून, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.

शहरामध्ये नुकताच थेट गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा सुरू झाला आहे. कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्येही हा पुरवठा सुरू झाला होता. सोमवारी रात्री शितल भोजने यांच्या घरामध्ये अचानक गॅस गळतीमुळे स्फोट झाला. यात शितल भोजने, आणखी एक महिला आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. घरातील फर्निचर, खिडक्या, काचा व इतर साहित्य जळून खाक झाले.

स्फोटानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानक प्रमुख जयवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य करण्यात आले. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर कुटुंबीयांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेला नेमके कोण जबाबदार? गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचा निष्काळजीपणा की इतर तांत्रिक कारण? याची चौकशी सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कळंबा जेल परिसरात गॅस स्फोट; चौघे जखमी, महिलेचा मृत्यू
Total Views: 151