बातम्या
“रस्ता रोको आंदोलन; आमदार राजेश क्षीरसागरांच्या कार्यतत्परतेमुळे गॅस पुरवठा सुरळीत!”
By nisha patil - 11/10/2025 4:36:30 PM
Share This News:
“रस्ता रोको आंदोलन; आमदार राजेश क्षीरसागरांच्या कार्यतत्परतेमुळे गॅस पुरवठा सुरळीत!”
कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी खंडित गॅस पुरवठ्याच्या संतापात रस्ता रोको केला!सकाळी अचानक नागरिकांनी गॅस टाक्या रस्त्यावर ठेऊन आंदोलन केले.
या घटनेची तातडीने पाहणी करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले.
नागरिकांनी सांगितले की, एजन्सीने गॅस पुरवठा वेळेत न केल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात त्रास होत आहे.
आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी आणि एचपी गॅस एजन्सीच्या मॅनेजरशी फोनवर संपर्क साधून तात्काळ गॅस पुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
सदर एजन्सी योग्य नसल्यास दुसऱ्या एजन्सीकडे गॅस वितरण देण्याचे आदेशही दिले.
आमदारांच्या कार्यतत्परतेमुळे अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत झाला आणि नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
संपूर्ण घटनेत आमदार क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
“रस्ता रोको आंदोलन; आमदार राजेश क्षीरसागरांच्या कार्यतत्परतेमुळे गॅस पुरवठा सुरळीत!”
|