बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये 11वी सायन्स विद्यार्थी व पालकांचा मेळावा संपन्न

Gathering of 11th grade Science


By nisha patil - 9/7/2026 6:53:34 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये 11वी सायन्स विद्यार्थी व पालकांचा मेळावा संपन्न

 
कोल्हापूर दि.9: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे सन 2026-27 साठी इयत्ता अकरावी सायन्स वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व पालक मेळावा संपन्न झाला. या समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व रोपाला पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर संस्था प्रार्थना झाली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका सौ .गीतांजली साळुंखे मॅडम यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये कॉलेज विषयी व संस्थेविषयी माहिती दिली. इयत्ता दहावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 98% वर मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आणि मागील वर्षाच्या सीईटी परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री एस टी शिंदे सर CET विभाग प्रमुख तसेच प्रा.एम.आर.नवले यांनी JEE व NEET याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यामध्ये महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व CETबद्दल माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सी बी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये या कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी म्हणून श्री.शेख व सौ.ऐश्वर्या साळुंखे मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कायक्रमाची सांगता प्रा.श्री आर. व्ही. घाटगे सर ज्युनिअर स्टाफ सेक्रेटरी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.   

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.ए पी पाटील व सौ एस ए माने यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन  प्रा.सौ गीतांजली साळुंखे ,प्रा.श्री नवले सर, प्रा घाटगे  सर  यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.पी. म्हात्रे  व सदस्य श्री एन एन  हिटणीकर, प्रा. एल. एस. नाकाडी, प्रा. आर. एन. पाटील, प्रा.एस .एस .जगताप, प्रा.कु. कांचन पाटील  ,सौ एस .ए. माने यांनी केले.तसेच यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यालयीन प्रमुख प्रबंधक श्री धनवडे सर, श्री.दुर्गुळे, श्री.करपे व इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभागा तर्फे या सर्वांचे विशेष आभार.


विवेकानंद कॉलेजमध्ये 11वी सायन्स विद्यार्थी व पालकांचा मेळावा संपन्न
Total Views: 4