बातम्या
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात
By nisha patil - 9/26/2026 3:38:12 PM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात
-हिरकणी मंचातर्फे आयोजन
कोल्हापूर कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि सौ. मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरी गीते सादर करून गौराईचे पारंपरिक खेळ उत्साहात सादर केले.
झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने, गायत्री आयरे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात
|