बातम्या

*गवसे ता. आजराचे सुपुत्र संजय पाटील यांना उद्योगरत्न नागरी पुरस्काराने सन्मानित

Gavse Tal Son of Ajra


By nisha patil - 11/18/2026 10:00:06 PM
Share This News:



*गवसे ता. आजराचे सुपुत्र संजय पाटील यांना उद्योगरत्न नागरी पुरस्काराने सन्मानित
 

*आजरा(हसन तकीलदार):-महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र आयोजित 16 वी राष्ट्रीय शिक्षण परिषद व पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये गवसे ता. आजरा येथील युवा उद्योजक तसेच सिनर्जीक सेफ्टी शूज कंपनीचे मालक संजय शामराव पाटील यांना राष्ट्रीय उद्योगरत्न नागरी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे.
     

संजय शामराव पाटील हे गवसे ता. आजरा येथील आहेत. मेडिकल क्षेत्रातील भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याच्या ध्यासाने साधारण 90 च्या दशकात शेतीमालावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्याचा उद्योग कारखाना सुरु केला. एका खेडेगावात अशा प्रकारे उद्योग संस्था सुरु करणे आव्हानात्मक असतानासुद्धा त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि आपला उद्योग सुरु करण्याचे धाडस केले. येथूनच त्यांच्या उद्योगधंद्यातील प्रगतीचा आलेख सुरु झाला. आता ते सिनर्जीक सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची गवसे येथे सुरवात करून गुणवत्तापूर्ण सेफ्टी शूज साधनांची निर्मिती सुरु केली. विशेष बाब म्हणजे सिनर्जीक सेफ्टी शूज भारतातील अनेक नामवंत कंपन्यामध्ये वापरले जात असून विविध नामांकित कंपन्याकडून या गुणवत्तापूर्ण सेफ्टी शूजची मागणी येत आहे. सेफ्टी शूज मध्ये त्यांनी आपला दर्जा सिद्ध केला आहे.
     

14 नोव्हेंबर 2026 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, पुणे रोड पंढरपूर जि. सोलापूर येथे हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले. ही बाब गवसे वासियासाठी भूषणावह आहे.या यशामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा. वंदना संजय पाटील यांची साथ मोलाची ठरली आहे. अशी माहिती गवसे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश हेब्बाळकर यांनी दिली.


*गवसे ता. आजराचे सुपुत्र संजय पाटील यांना उद्योगरत्न नागरी पुरस्काराने सन्मानित
Total Views: 34