बातम्या

फुलेवाडीत गवळी टोळीचा हल्ला; महेश राखचा खून, १५ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा

Gawli gang attack in Phulewadi


By nisha patil - 9/15/2025 2:46:49 PM
Share This News:



फुलेवाडीत गवळी टोळीचा हल्ला; महेश राखचा खून, १५ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा

फुलेवाडी येथील गंगाई लोन मागे शुक्रवारी रात्री टोळी हल्ल्यात महेश राखचा खून झाला. प्राथमिक तपासात आदित्य गवळीच्या पत्नीला पळवून नेल्यामुळे निर्माण झालेल्या वैरातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी महेशने आदित्य गवळीला एडका लावून धमकावले होते. यानंतर संतप्त गवळी टोळीने महेशवर हल्ला चढवून त्याचा खून केला.

हल्ल्यात १५ ते १७ जणांचा सहभाग असून त्यापैकी काहींवर गुन्हा दाखल झाला आहे. सोहम शेळके याच्यासह आणखी काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महेश राख याला यापूर्वी वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले होते, तरी तो गणेशोत्सवासाठी गावात परतला होता. या घटनेमुळे फुलेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


फुलेवाडीत गवळी टोळीचा हल्ला; महेश राखचा खून, १५ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा
Total Views: 54