मनोरंजन
जनरेशन अल्फा मुलींना सर्वाधिक आकर्षण कोणत्या करिअरचं?”
By nisha patil - 10/9/2025 11:14:35 AM
Share This News:
मुंबई | २०१० ते २०२५ दरम्यान जन्मलेल्या जनरेशन अल्फा पिढीतील मुलींच्या करिअर निवडीवर आधारित सर्वेक्षण समोर आलं असून त्यात कलाकार होण्याची इच्छा सर्वाधिक मुलींनी व्यक्त केली आहे.
जीएल ग्लोबल आणि हिंदुजाल कॅपिटलिस्ट यांनी केलेल्या या सर्वेक्षणानुसार, ११% मुलींना कलाकार व्हायचं आहे. त्यानंतर डॉक्टर/आरोग्यसेवा व्यावसायिक (९%), वैज्ञानिक/अभियंता (९%), तसेच शिक्षक (९%) हा क्रम दिसतो.
याशिवाय कंटेंट क्रिएटर/इन्फ्लुएंसर (९%), वकील (९%), व्हिडिओ गेम डिझायनर/टेक डेव्हलपर (९%), पत्रकार/लेखक (९%), ब्युटी प्रोफेशनल (८%), वैमानिक/अंतराळवीर (६%), हॉटेल मॅनेजमेंट/डॉक्टर (६%), पोलिस/अग्निशामक दल/सैनिक (६%) आणि शेफ (४%) अशा करिअरनाही पसंती मिळाली आहे.
या निष्कर्षावरून, नव्या पिढीतील मुलींची करिअर निवड ही केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरती मर्यादित नसून कला, तंत्रज्ञान आणि विज्ञान या सर्व क्षेत्रांत त्यांना प्रगती साधायची आहे, हे स्पष्ट होतं.
जनरेशन अल्फा मुलींची करिअर पसंती : कलाकार, डॉक्टर आणि वैज्ञानिक आघाडीवर
|