राजकीय

घरकुल योजनेचे अनुदान रखडले; शिवसेनेचा इशारा – “त्वरित निधी द्या, अन्यथा आंदोलन”

Gharkul scheme grant stalled Shiv Sena warns Give funds immediately otherwise protest


By nisha patil - 4/29/2026 11:00:17 AM
Share This News:



घरकुल योजनेचे अनुदान रखडले; शिवसेनेचा इशारा – “त्वरित निधी द्या, अन्यथा आंदोलन”


कागल तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरे पूर्णत्वास आली असली, तरीही अंतिम हप्त्याचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून, या प्रश्नावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.


शिवसेना कागल तालुका प्रमुख  मा. जयसिग टिकले यांनी गट विकास अधिकारी, कागल यांना निवेदन देत तातडीने अनुदान जमा करण्याची मागणी केत घरकुल योजनेचा अंतिम हप्ता संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबली असून, त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.


“शासनाने त्वरिसंबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, स्थानिक पातळीवर या प्रश्नाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
यावेळी  शिवसेना तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख नवनाथ पाटील वाहतूक सेना शहराध्यक्ष माळू करीकट्टी, विभाग प्रमुख अमृत पाटणकर ,विभाग प्रमुख नितीन भोकरे, विभाग प्रमुख राजू साबळे, युवा सेना शहर प्रमुख गणेश लामतुरे, अनिल शेट्टी व शिवसैनिक उपस्थित होते.

शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके


घरकुल योजनेचे अनुदान रखडले; शिवसेनेचा इशारा – “त्वरित निधी द्या, अन्यथा आंदोलन”
Total Views: 21