बातम्या
ट्रक अपघातात घाटकरवाडीचा युवक ठार
By nisha patil - 2/13/2026 1:55:42 PM
Share This News:
ट्रक अपघातात घाटकरवाडीचा युवक ठार
आजरा(हसन तकीलदार):- आजरा आंबोली महामार्गावर गवसे जवळील घरचा दरबार हॉटेलच्या मागील वळणावर झाडाला ट्रक आदळल्याने ट्रकचा मालक जागीच ठार झाला. सुमित भाऊ पाटील (वय 21 रा. घाटकरवाडी ता. आजरा )असे त्याचे नाव आहे. तर ट्रक ड्रायव्हर राज आनंदा कांबळे (वय 21 रा. कराड )हा किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, सुमित पाटील हा सकाळी साडेनऊ वाजता ट्रकमधून कागद तयार करण्याचे रोलर घेऊन कोल्हापूरकडे जात होता. ट्रकच्या क्लीनरसाईडला म्हणजेच ट्रकच्या डाव्या बाजूस तो बसला होता. गवसेच्या मागे घरचा दरबार हॉटेलच्या जवळील वळणावर एका झाडाला ट्रक अचानक आदळला यावेळी झाडाला ट्रक जोराने धडकल्याने डाव्या बाजूस ट्रक पलटी झाला त्यामुळे रोलर चे वजन डाव्या बाजूला पडल्याने जोरदार धडके मुळे सुमितचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर राज कांबळे याचा गिअर बॉक्स मध्ये पाय अडकला होता जेसीबीच्या सहाय्याने केबिनचा पत्रा उचकटून त्याला बाहेर काढण्यात आले यात तो किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी गवसे, घाटकरवाडी, धनगरमोळा येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी तातडीने राज कांबळे याला दवाखान्यात दाखल केले.
ट्रक अपघातात घाटकरवाडीचा युवक ठार
|