बातम्या
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विना कपात ३४०० रुपये
By nisha patil - 10/27/2025 11:32:33 AM
Share This News:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विना कपात ३४०० रुपये
मंत्री हसन मुश्रीफ यांची बाराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभात घोषणा
बेलेवाडी काळम्मा, ता. कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल प्रति टन विनाकपात ३४०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प करण्यात आला आहे.
मुश्रीफ म्हणाले, “एफआरपी वाढते पण साखरेचे दर स्थिर आहेत. साखर कारखानदारी टिकवायची असेल तर एकरी उत्पादनवाढ हाच पर्याय आहे.” कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एकरी १५० टन उत्पादन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितले की, या हंगामात आठ लाख टन ऊस गाळप, अडीच कोटी लिटर इथेनॉल उत्पादन आणि आठ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले, तर आभार संतोष मोरबाळे यांनी मानले.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विना कपात ३४०० रुपये
|