बातम्या
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू घोसरवाड द्वितीय
By nisha patil - 10/1/2026 10:37:48 PM
Share This News:
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू घोसरवाड द्वितीय
राज्यस्तरावरील नागपूर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड.
दिल्ली व मोठमोठ्या शहरातील हवेतील प्रदूषणावर शोधला उपाय
हेरवाड:प्रतिनिधी अतिक पटेल: शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व मॉडर्न विद्यानिकेतन आळते यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरोळ तालुक्यातील उर्दू विद्यामंदिर घोसरवाड या शाळेचा द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत मॅडम शिक्षक नेते दादासाहेब लाड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार यांच्या हस्ते बाल संशोधक युसरा आबीद बीन मौलवी व जोया सलाउद्दीन जमादार तसेच मार्गदर्शक शिक्षक मुहम्मद आसिफ खलील मुजावर यांना शिल्ड व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
या यशाबद्दल घोसरवाड व शिरोळ तालुक्यातील सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन होत असून शाळेच्या कार्याचा गौरव वाढला आहे.या यशासाठी शाळेचे शिक्षक मुहम्मदआसिफ खलील मुजावर,नसीमा काबिलपाशा पटेल,नाजीया महमदरफीक पटेल,आसिया अजमेर बागवान व शाळेचे मुख्याध्यापक काबीलपाशा अब्दुलकरीम पटेल यांनी परिश्रम घेतले तर केंद्रप्रमुख रियाज चौगले,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे व गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच विज्ञान समिती राज्य उपाध्यक्ष श्रीशैल मठपती सर व प्राजक्ता पाटील मॅडम व समितीच्या इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू घोसरवाड द्वितीय
|