बातम्या

25 हजारांच्या लाचेप्रकरणी गिरोलीच्या तलाठ्याला अटक 

Giroli Talatha arrested in bribery case


By nisha patil - 5/27/2025 4:28:26 PM
Share This News:



25 हजारांच्या लाचेप्रकरणी गिरोलीच्या तलाठ्याला अटक 

जप्त केलेला जे सी बी सोडवण्यासाठी मागितली होती लाच.


जप्त केलेला जेसीबी ताब्यात देण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पन्हाळा तालुक्यातील गिरोलीच्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतलं. रमेश मुरलीधर वळिवडेकर असं आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने सोमवार ही कारवाई केली.अशी माहिती पोलीस एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कसबा बावडा येथील तक्रारदार  व्यापाऱ्याची गिरोली येथे जमीन आहे. पाण्या अभावी पिकांचेनुकसान होऊ लागल्याने संबंधिताने शेतात कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. शेतात जाणारा गायरान रस्ता उंचावर, खडबडीत असल्याने त्यांनी जेसीबीद्वारे खडी पसरवून रस्ता व्यवस्थित करून घेतला. मात्र, तलाठी वळिवडेकर यांनी त्यास हरकत घेत  परवानगी न घेता बेकायदा काम करीत असल्याचा ठपका ठेवून जेसीबी ताब्यात घेतला. आणि जेसीबी सोडवायचा आणि कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास ५० हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती ३० हजार रुपयांची मागणी करून २५ हजार रुपयांवर सौदा ठरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.


25 हजारांच्या लाचेप्रकरणी गिरोलीच्या तलाठ्याला अटक 
Total Views: 106