बातम्या
कसबा बावड्यातील रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी २ लाख द्या - सचिन चौगले
By nisha patil - 11/26/2026 3:22:48 PM
Share This News:
कसबा बावड्यातील रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी २ लाख द्या - सचिन चौगले
कसबा बावडा प्रभाग क्रमांक १ मधील रांगी ड्रेन नाल्याची नियमित स्वच्छता करण्यासाठी दरवर्षी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन चौगले यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कसबा बावडा परिसरातील रांगी ड्रेन हा पावसाळी पाणी आणि नागरी वसाहतीतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या नाल्याची लांबी सुमारे सहा हजार रनिंग फूट असून, दरवर्षी वेळेत सफाई न झाल्यास नाल्यात गाळ, कचरा आणि झाडाझुडपांमुळे पाण्याचा निचरा अडतो.
याचा थेट फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत असून, अंदाजे ४०० ते ५०० एकर शेती पाण्यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या नाल्याची नियमित सफाई आणि तणनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी अंदाजे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी दरवर्षी उपलब्ध करून दिल्यास नाल्याची वेळेत स्वच्छता होऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन चौगले यांनी केली आहे.
यावेळी राजू लाटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कसबा बावड्यातील रांगी ड्रेनच्या सफाईसाठी दरवर्षी २ लाख द्या - सचिन चौगले
|