बातम्या

सारथीला बार्टी-महाज्योतीच्या बरोबरीचा निधी द्या; मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Give Sarathi funds equal to Barti


By nisha patil - 11/13/2026 7:37:16 PM
Share This News:



सारथीला बार्टी-महाज्योतीच्या बरोबरीचा निधी द्या; मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

सारथीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक समानतेचा न्याय द्या! बार्टी आणि महाज्योतीच्या समकक्ष निधी, प्रलंबित अधिछात्रवृत्तीचे तातडीने वितरण आणि सक्षम प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून द्या, अशी जोरदार मागणी 'एक मराठा, कोल्हापूर'च्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांसाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या सारथी संस्थेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अधिछात्रवृत्तीचे हप्ते रखडणे, घरभाडे भत्ता आणि संशोधन अनुदान मिळण्यास विलंब होणे, तसेच शिष्यवृत्ती योजनांमधील अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

डिसेंबर २०२५ मधील आकडेवारीनुसार, सारथीचे १५५ कोटी रुपये अधिछात्रवृत्ती प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बार्टी आणि महाज्योतीच्या तुलनेत सारथीला आर्थिक स्थैर्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित अधिछात्रवृत्ती, घरभाडे भत्ता आणि संशोधन अनुदान तातडीने वितरित करावे, सारथीच्या योजनांसाठी स्वतंत्र निधी निश्चित करावा, रिक्त प्रशासकीय पदे भरावीत आणि मागील पाच वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशा दहा प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

ॲड. बाबा इंदूलकर, विजय देवणे, बाबा पार्टे, ॲड. सतीश नलवडे आणि अमित अतिग्रे यांच्यासह 'एक मराठा, कोल्हापूर'च्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.


सारथीला बार्टी-महाज्योतीच्या बरोबरीचा निधी द्या; मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
Total Views: 46