बातम्या

शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ला संधी द्या

Give a chance to the Parivartan Vikas Aghadi


By nisha patil - 2/12/2025 3:36:11 PM
Share This News:



शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ला संधी द्या
 

आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायत निवडणुकीत चूरशीची लढाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ आम. सतेज पाटील यांनी आजरा दौरा करून प्रत्येक वॉर्डात आपली सभा घेतली आणि आपल्या आघाडीची भूमिका मांडली. परिवर्तन आघाडी सत्तेत आल्यास काय काय परिवर्तन करणार याबाबत प्रभाग क्र. 14चे नगरसेवक पदाचे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले यामध्ये प्रामुख्याने शहरातील प्राथमिक गरजा आणि सर्वसामान्य गरीब जनतेचा विचार करण्यात आला आहे - 
 

पर्यावरण पुरक शहर विकासाचा आराखडा तयार करणार
- ⁠राज्यातले पहिले स्वतंत्र कृषी धोरण असेलेली नगरपंचायत आजरा असणार
- ⁠जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा  स्त्रोतांचा वापर करणार 
- ⁠ड्रेनेजचे पाणी थेट नदी मध्ये जावू देणार नाही (STP) प्रकल्पासाठी नव्याने प्लानिंग करणार 
- ⁠वाढीव व नविन कॅालनीमध्ये रस्त्यावरील दिवे, रस्ते, सांडपाणी व पाणीपुरवठा सुरळीत करणार
- ⁠पथ विक्रेते व भाजी विक्रेते यांना जागा भाडे किंवा दंड माफ करणार
- ⁠कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणार 
- ⁠आवंडीला बायपास रस्त्यावरून कचरा वाहतूक करणार
- ⁠गांधीनगरसह शहरातील सर्व प्रोपर्टी कार्ड चे प्रश्न मार्गी लावणार
- ⁠आणि माझा प्रभाग क्रमांक १४ तर शहर विकासतील मॉडेल प्रभाग असेल असा विकास साधणार
- ⁠घरकूल निर्माण योजना प्रभावीपणे राबवून नगरपंचायत कडून जादाची मदत देणार
- ⁠महिलांसाठी नियमित प्रभागवार आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करुन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणार
- ⁠खेळाडूंसाठी विशेष बजेट करुन त्यांना नियमित मदत देणार
- ⁠छोटी घरे असणाऱ्या गरीब लोकांना नगरपंचायत करातून सूट देणार 
- ⁠ट्राफिक चे सुयोग्य नियोजन करणार
- ⁠डांसांवरचे औषध नियमित फवारणी करणार 
- ⁠स्वच्छ सर्वेक्षण आणि सुंदर शहरांच्या यादीत आजरा नाव अव्वल 🥇 करणार…

या व आशा अनेक कामांना न्याय देण्यासाठी शहरांतील सर्व मतदारांनी आमच्या परिवर्तन विकास आघाडीतील सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदान करुन सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ला संधी द्याशाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ला संधी द्या
Total Views: 221