विशेष बातम्या

महादेवी हत्तीण परत द्या!" सुमारे ४५ किमी मूक पदयात्रा,

Give back the Mahadevi elephant


By nisha patil - 4/8/2025 2:39:06 PM
Share This News:



महादेवी हत्तीण परत द्या!"  सुमारे ४५ किमी मूक पदयात्रा, 

जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट पदयात्रा...

नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तीण गुजरातमधील बन्सगड (बनतारा) कन्याश्रय संवर्धन केंद्रात हलवण्यात आल्याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांनी मोठा मोर्चा काढला. सुमारे ४५ किमी अंतराची मूक पदयात्रा करत आलेल्या हजारो नागरिकांनी महादेवी हत्तीण परत नांदणीत आणण्याची जोरदार मागणी केली.

या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. त्यांनी सभेत सांगितलं, "महादेवी हत्तीण ही आमच्या १२०० वर्षांच्या परंपरेचा भाग आहे. तिचं दुसरीकडे स्थलांतर म्हणजे आमच्या संस्कृतीवर घाला आहे. हे आम्हाला मान्य नाही!"

नांदणी येथील जैन धर्मसंस्थेने दाखल केलेल्या याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर महादेवी हत्तीण गुजरातमध्ये हलवण्यात आली. यास स्थानिक नागरिक आणि विविध समाजघटकांचा तीव्र विरोध आहे.मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


महादेवी हत्तीण परत द्या!" सुमारे ४५ किमी मूक पदयात्रा,
Total Views: 117